खतांची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:45+5:302021-07-30T04:15:45+5:30

करण्यात आल्यामुळे कोणत्याही प्रकारची टंचाई नाही, असेही बनकर यांनी म्हटले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ व कृषीमंत्री दादा भुसे यांनी ...

Action against those who create artificial scarcity of fertilizers | खतांची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई

खतांची कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई

googlenewsNext

करण्यात आल्यामुळे कोणत्याही प्रकारची टंचाई नाही, असेही बनकर यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ व कृषीमंत्री दादा भुसे यांनी लक्ष घातल्याने येवला तालुक्यात जूनअखेर २५६० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला आहे. जुलै महिन्यात पावसाच्या आगमनानंतर पेरणीस वेग येऊन पेरणी झालेल्या क्षेत्रासाठी एकूण १९०० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. येवला तालुक्यात युरिया अथवा इतर संयुक्त खतांची टंचाई नाही. तथापि, वितरकांकडून शेतकरी बांधवांची लेखी स्वरूपात तक्रार आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल तसेच ज्या ठिकाणी खतांची विक्री होत आहे, त्याठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना खताची विक्री करण्यात येत आहे. यात काही गैरप्रकार आढळल्यास शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सभापती संजय बनकर यांनी केले आहे.

चौकट===

जिल्ह्यातील खतांची आकडेवारी

१) युरिया - ५३,२७३

२) डीएपी - ७,८९०

३) एमओपी - ३,२८३

४) संयुक्त खते - ४८,०५४

५) एसएसपी - १४,८५५

एकूण - १,२४,६७१ मेट्रिक टन

Web Title: Action against those who create artificial scarcity of fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.