शेतकऱ्यांना दमबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 21:14 IST2020-11-02T21:13:35+5:302020-11-02T21:14:11+5:30
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत कोथिंबीर घेऊन आलेल्या शेतकऱ्यावर दादागिरी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती देविदास पिंगळे यांनी त्या व्यापाऱ्याचा परवाना निलंबित केला.

शेतकऱ्यांना दमबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत कोथिंबीर घेऊन आलेल्या शेतकऱ्यावर दादागिरी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती देविदास पिंगळे यांनी त्या व्यापाऱ्याचा परवाना निलंबित केला.
गेल्या आठवड्यात उमराणे येथील शेतकरी अशोक देवरे यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत कोथिंबीर विक्रीकरिता आणली होती. लिलाव दरम्यान योग्य दर मिळाला नसल्याने देवरेंनी कोथिंबीर परत नेण्याचा निर्णय घेतल्याने देवरे आणि व्यापारी मोहन खांडबहाले यांच्यात वाद सुरू असताना त्याचा शेतकऱ्याने मोबाईलवर व्हिडिओ तयार करून सोशल मिडियावर व्हायरल केला. सदर प्रकारची माहिती कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती देविदास पिंगळे यांना मिळाली होती त्यानंतर पिंगळे यांनी या प्रकरणी तत्काळ दखल घेत बाजार समितीची प्रतिमा मलिन केली म्हणून व्यापारी खांडबहाले यांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली.
तर कारवाई करणार
कृषी उत्पन्न बाजारसमिती शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना दमबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई केली असून यापुढे कोणत्याही व्यापारी व आडत्याने शेतकऱ्यावर दादागिरी केल्याचा प्रकार उघडकीस आला किंवा तक्रार प्राप्त झाल्यास बाजारसमितीकडून कारवाई केली जाईल.
- देविदास पिंगळे, सभापती, कृउबा