जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:16 AM2018-09-15T01:16:15+5:302018-09-15T01:16:49+5:30
कर्तव्यात कसूर करण्यासोबतच कामात अनियमितता आणि विनापरवानगी गैरहजर राहणे आदी विविध बाबतीत दोषी आढळून आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा धडाका सुरूच असून, लाडची येथील ग्रामसेवकावर अनधिकृत रजेवर राहण्याच्या कारणावरून सक्तीने सेवानिवृत्तीसह सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकास सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्यात आली
नाशिक : कर्तव्यात कसूर करण्यासोबतच कामात अनियमितता आणि विनापरवानगी गैरहजर
राहणे आदी विविध बाबतीत दोषी आढळून आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा धडाका सुरूच असून, लाडची येथील ग्रामसेवकावर अनधिकृत रजेवर राहण्याच्या कारणावरून सक्तीने सेवानिवृत्तीसह सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकास सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्यात आली
आहे. तसेच इगतपुरीतील एका शिक्षकाची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यासह अन्य दोन कर्मचाºयांना खातेचौकशीच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने शुक्रवारी दिली.
त्र्यंबक व नाशिक तालुक्याच्या आढावा बैठकीत आठ कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर नाशिक तालुक्यातील लाडची ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले तत्कालीन ग्रामसेवक मोठाभाऊ भामरे यांच्यावर अनधिकृत रजेवर राहणे, ग्रामपंचायतीच्या सभांचे इतिवृत्त न लिहिणे, त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसांना अर्वाच्य व अशासकीय स्वरूपात खुलासा सादर करणे याबाबत विभागीय खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यात ते दोषी आढळून आल्याने जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियमानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचे आदेश दिले आहेत. तर घोटी येथील उर्दू शाळेतील शिक्षक मोहम्मद इरफान मुख्तार अहमद यांना अनधिकृत गैरहजर राहणे, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करण्यासाठी दोषी आढळल्याने त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात आली आहे. सुरगाणा येथील कहानडोळपाडा शाळेतील शिक्षक मनोहर गायकवाड यांनाही सेवेतून बडतर्फ करण्याबाबत अंतिम कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. कळवण तालुक्यातील धार्डेदिगर येथील ग्रामसेवक सुनील यादव, सुरगाणा तालुक्यातील शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी मंदोदरी पाटील यांना खातेचौकशीची नोटीस बजाविण्यात आली आहे.