सिडकोतील चार हॉटेल्ससह बारवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:15 AM2021-03-15T04:15:01+5:302021-03-15T04:15:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून रविवारी सुटीच्या दिवशी सिडकोच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून रविवारी सुटीच्या दिवशी सिडकोच्या चार हॉटेल्स आणि बारवर कारवाई करून ४१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी शनिवारी (दि.१३) महापालिकेत खातेप्रमुख आणि पोलिसांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी धडक कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, खुद्द आयुक्त कैलास जाधव हेच कारवाईच्या आघाडीवर असून शनिवारी रात्री त्यांनी कॉलेज रोड आणि परिसरातील दोन हॉटेल्समध्ये अचानक भेट देऊन सुरक्षित अंतर नियमांचे पालन न करणाऱ्या व्यवसायांवर कारवाई केली होती आणि दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला होता.
त्यानंतर रविवारी (दि.१४) सुटीचा दिवस असतानाही आयुक्तांनी सिडकोतील शिवाजीनगर मार्केट भागात अचानक भेट दिली आणि ४१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना देखील दंड करण्यात आला.
यावेळी घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे, विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, पोलीस निरीक्षक निंबाळकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक गांगुर्डे व इतर कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.
फोटो एनएसके एडिट वर