पंचवटीत पाणीपट्टी थकविणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:24 AM2021-02-18T04:24:42+5:302021-02-18T04:24:42+5:30
पंचवटी विभागातील हिरावाडी, मखमलाबाद, म्हसरूळ, मेरी, आडगाव, पंचवटी कारंजा, दत्तनगर, पेठरोड, हनुमानवाडी, रामवाडी, या भागात राहणाऱ्या पाणीपट्टी थकबाकीदारांविरुद्ध कारवाई ...
पंचवटी विभागातील हिरावाडी, मखमलाबाद, म्हसरूळ, मेरी, आडगाव, पंचवटी कारंजा, दत्तनगर, पेठरोड, हनुमानवाडी, रामवाडी, या भागात राहणाऱ्या पाणीपट्टी थकबाकीदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाची पाणीपट्टी भरावी यासाठी वारंवार सूचना देऊन थकबाकीदारांना आवाहन केल्यानंतर टाळाटाळ केली म्हणून नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी अजूनही महापालिका कर थकविला आहे त्यांनी वेळेत कर भरून पालिकेला सहकार्य करावे अन्यथा त्यांच्या नळजोडण्या खंडित करण्याचे काम यापुढे सुरू राहील, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. महापालिकेचे के.एच. राबडिया, पी. एच. ठेपणे, पी. एम. पवार, वि. एल. काकड, आर. एन. मोरे आदींनी ही कारवाई केली.
इन्फो===
वसुलीसाठी पथक
पंचवटी महापालिका प्रशासनाने थकबाकी वसुलीसाठी विशेष पथक कार्यान्वित केले आहे. या पथकामार्फत दररोज पंचवटी भागात थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे. आगामी कालावधीत थकबाकी वसुली धडाक्यात सुरू करून मनपा कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे.
-विवेक धांडे, पंचवटी विभागीय अधिकारी,