बेशिस्त ५३ अॅपेरिक्षा चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 09:53 PM2020-02-07T21:53:58+5:302020-02-08T00:09:05+5:30
मेशी धोबीघाट अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५३ अॅपेरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ९० दिवसांसाठी संबंधित वाहनांची नोंद रद्द करण्यात आली आहे. येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध मोहीम सुरू राहणार आहे.
मालेगाव : मेशी धोबीघाट अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५३ अॅपेरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ९० दिवसांसाठी संबंधित वाहनांची नोंद रद्द करण्यात आली आहे. येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध मोहीम सुरू राहणार आहे.
देवळा-मालेगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये अॅपेरिक्षातील ९ प्रवाशांचा समावेश होता. या अपघाताची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाºया वाहनधारकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वायुवेग पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत मालेगाव, देवळा, नांदगाव, कळवण, सटाणा कार्यक्षेत्रात ५३ अॅपेरिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची ९० दिवसांसाठी नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
१३ फेब्रुवारीपर्यंत या मोहिमेत सातत्य राहणार असल्याची
माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी
दिली.
अनेकांचे धाबे दणाणले
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत असलेल्या धडक कारवाईमुळे अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाºया अॅपेरिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे. कारवाईच्या भीतीमुळे रिक्षा घरीच उभ्या केल्या आहेत.