मिठाईसह कपड्यांच्या दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:02+5:302021-04-10T04:14:02+5:30
सिन्नर : शहरातील तीन कपड्यांच्या दुकानांसह सरदवाडी रोडवरील एका मिठाईच्या दुकानावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरूवारी ...
सिन्नर : शहरातील तीन कपड्यांच्या दुकानांसह सरदवाडी रोडवरील एका मिठाईच्या दुकानावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरूवारी (दि. ८) कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
गणेशपेठेतील मे. गणेश सखाराम पवार या फर्ममध्ये २० ते २५ लोक गर्दी करून खरेदी करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने त्याठिकाणी येत बाहेरून लावलेले कुलूप उघडण्यास मालकाला भाग पाडले. त्यानंतर मिळालेली माहिती खरी ठरली. या दुकानदाराला दहा हजार रूपयांचा दंड करण्यात आला. गणेश साड़ी सेंटरमध्येही छापा टाकण्यात आला. त्यांना पाच हजार रूपयांचा दंड करण्यात आला. बुधवारी कोठुरकर यांच्या कोल्ड्रिंक्सच्या दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नायब तहसीलदार नितीन गर्जे, दत्ता सोनवणे, विशाल धुमाळ, मुरलीधर चौरे, खडताळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
इन्फो
दुकानदारालाच शीतपेय पडले गरम
भिकुसा कॉर्नर येथे एका कपड्याच्या सेल दुकानाला पाच हजारांचा दंड करण्यात आला. तसेच सरदवाडी रोडवर मिठाईच्या दुकानात उभे राहून ग्राहक शीतपेय पीत असल्याचे आढळल्याने दुकानदाराकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रोहित पगार, विजय वाजे, सचिन कापडणीस व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.