‘नामको’वर सभासद राजआणण्यासाठी कृती समिती लवकरच बैठक : महाराष्टÑ चेंबरचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:08 AM2018-04-08T01:08:02+5:302018-04-08T01:08:02+5:30
नाशिक : शहरातील सर्वात मोठ्या स्थानिक नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेतील साडेचार वर्षांची प्रशासकीय राजवट हटवून सभासद नियुक्त संचालक मंडळ आणण्यासाठी आता महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सने पुढाकार घेतला.
नाशिक : शहरातील सर्वात मोठ्या स्थानिक नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेतील साडेचार वर्षांची प्रशासकीय राजवट हटवून सभासद नियुक्त संचालक मंडळ आणण्यासाठी आता महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सने पुढाकार घेतला असून, लवकरात लवकर या विषयाची तड लावण्यासाठी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय शनिवारी (दि.७) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सारडा संकुल येथील चेंबरच्या बाबुभाई राठी सभागृहात सदरची बैठक पार पडली. यावेळी व्यापार, उद्योग, शेती, बॅँकिंग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नाशिक मर्चंट बॅँक ही जिल्ह्यातील सर्वात मोठी स्थानिक सहकारी बॅँक असून, दोन लाखांच्या घरात सभासद आहेत. २०१४ मध्ये तांत्रिक कारणाने समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. प्रशासक नियुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांत सभासद नियुक्त संचालकांची निवड करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र साडेचार वर्षे होऊनही प्रशासक मंडळ कायम आहे. याबाबत चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी याबाबत माहिती दिली. बॅँकेच्या हिताचा विचार केला तर आताच सभासद नियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आणण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे यावेळी ठरविण्यात आले तसेच यासाठीच सर्वसमावेशक कृती समिती गठित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. पुढील बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. कौशल्य फाउंडेशनचे श्रीधर व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले तर प्रमोद पुराणिक यांनी आभार मानले.