कृती समितीचे धरणे आंदोलन
By admin | Published: September 30, 2016 01:20 AM2016-09-30T01:20:42+5:302016-09-30T01:26:02+5:30
कृती समितीचे धरणे आंदोलन
मालेगाव : आदिवासी, बौद्ध, चर्मकार, मातंग समाजाचा सहभागमालेगाव : जिल्ह्यात व परजिल्ह्यात विविध समाजाच्या नागरिकांवर झालेल्या अन्यायाला न्याय द्यावा तसेच बलात्कार करून खून करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी येथील आदिवासी, बौद्ध, चर्मकार, मातंग, वाल्मीकी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकदिवसीय धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
राज्यात दलित, बहुजन आदिवासी मातंग समाजावर अत्याचार होत आहेत. धुळे जिल्ह्यातील ईश्वर न्याहाळे या तरुणाची हत्त्या करण्यात आली. तसेच खडकी बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथील नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात
आला. सोनई, जवखेडे, खैरलांजी यासह अनेक प्रकार घडले आहेत. यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी. तसेच नाशिक येथील नांदूरनाका भागात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यांसह विविध मागण्यांप्रश्नी पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले होते.
या आंदोलनात रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष देवराज गरुड, दादाजी महाले, संजीवन वाघ, देवीदास कांबळे, मदन माळी, राजू माळी, भगवान आढाव, दिनेश साबणे, बाळू पवार, दिलीप पाथरे, प्रशांत गरुड, रामदास शिरसाठ, रमेश पवार, राजेश सौदे, देवीदास कुवर, प्रमोद देवरे, शांताराम सोनवणे, रमेश निकम आदिंसह समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)