नगरसेवकांवर कारवाई; अभियंता धारणकर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:05 AM2019-06-26T01:05:18+5:302019-06-26T01:05:50+5:30

ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी बेकायदा शुभेच्छा फलक लावल्याचे निमित्त करून चार नगरसेवकांवर गुन्हा दाखल करणाऱ्या पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांना मंगळवारी (दि. २५) महासभेत कारवाईला सामोरे जावे लागले.

 Action of corporators; Engagement holder suspended | नगरसेवकांवर कारवाई; अभियंता धारणकर निलंबित

नगरसेवकांवर कारवाई; अभियंता धारणकर निलंबित

Next

नाशिक : ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी बेकायदा शुभेच्छा फलक लावल्याचे निमित्त करून चार नगरसेवकांवर गुन्हा दाखल करणाऱ्या पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांना मंगळवारी (दि. २५) महासभेत कारवाईला सामोरे जावे लागले. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय आणि पक्षपाती कारवाईचा ठपका ठेवत धारणकर यांना निलंबित करण्याची एकमुखी मागणी केली. महापौरांनीही ती मान्य केली तसेच त्यांना निलंबित करतानाच सभागृहाबाहेरही काढण्यात आले.
रमजान ईदनिमित्ताने शुभेच्छा फलक लावल्याप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रु पाली निकुळे आणि शाहीन मिर्झा यांच्यावर पूर्व विभागीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी (दि.२५) महासभेस प्रारंभ होताच सतीश कुलकर्णी यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. फलक लावले व गुन्हा दाखल झाला तेव्हा आपण नाशिकमध्ये नव्हतोच. शिवाय परस्पर फलक लावणाºया कार्यकर्त्याचे नाव सांगत असतानाही आपल्यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. रमजान काळातच आपल्या आईचे निधन झाले. त्या दु:खात मी शुभेच्छा फलक कसा लावेल, असा सवाल करीत नगरसेविका शाहीन मिर्झा यांनी प्रशासनाच्या कारवाईवर आक्षेप नोंदवला, तर गुन्हे दाखल करण्याच्या या संपूर्ण प्रकरणाच्या पाठीमागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय चंद्रकांत खोडे यांनी व्यक्त केला. रूपाली निकुळे यादेखील आक्रमक झाल्या संबंधित अधिकाºयास निलंबित करेपर्यंत पीठासन सोडणार नाही, असा पवित्रा घेऊन त्यांनी ठिय्या मांडला, मात्र महापौरांच्या विनंतीनंतर त्यांनी पीठासन सोडले.
यावेळी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी या संपूर्ण प्रकरणाचा आयुक्तांनी खुलासा करण्याची मागणी केली. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी आपली परवानगीच घेतली नसल्याचे सांगताच सभागृहात एकच गोंधळ झाला. धारणकरांना निलंबित करा, अशा घोषणा देण्यात आल्यानंतर महापौर भानसी यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिलेच, परंतु सभागृह सोडण्याचेही आदेश दिले. अधिकाºयांनी यापूर्वी अशी हिंमत कधी दाखविली नव्हती. हा नगरसेवकांना बदनाम करण्याचा प्रयत्न असून, गुन्हा तातडीने मागे घ्यावा. तसेच संबंधित नगरसेवकांची अधिकाºयाने माफी मागावी, असे महापौर भानसी यांनी यावेळी सांगितले.
नगरसेवकांचा आरोप
रवींद्र धारणकर हे मुळात अभियंता असून, त्यांना बळजबरीने विभागीय अधिकारीपद देण्यात आले आहे. त्यावरदेखील काही नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. त्यांना आपली जबाबदारीच माहिती नाही, मात्र त्यांची नियुक्ती कशी काय केली गेली, असा प्रश्न गुरुमित बग्गा, सुधाकर बडगुजर यांनी केला.

Web Title:  Action of corporators; Engagement holder suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.