कृषी उत्पन्न बाजार समितीतील थकबाकीदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:48 AM2018-07-28T00:48:07+5:302018-07-28T00:48:29+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्या गाळेधारकांनी बाजार समितीचे सेवा शुल्क थकविले आहे, अशा गाळेधारकांविरुद्ध बाजार समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बाजार समितीने सुरू केलेल्या या कारवाई विरुद्ध गाळेधारकांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्या गाळेधारकांनी बाजार समितीचे सेवा शुल्क थकविले आहे, अशा गाळेधारकांविरुद्ध बाजार समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बाजार समितीने सुरू केलेल्या या कारवाई विरुद्ध गाळेधारकांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
बाजार समितीत भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांनी बाजार समितीचे सेवा शुल्क मुदत देऊनही भरलेले नाही, जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या सूचनेनुसार गाळेधारकांनी सेवा शुल्क भरणे गरजेचे आहे; मात्र काही गाळेधारक वगळता उर्वरित गाळेधारकांनी सेवा शुल्क भरण्याची मुदत मागितली होती. त्यानंतरही सेवा शुल्क भरलेले नसल्याने बाजार समितीने कारवाईची मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिली आहे. बाजार समितीतील काही गाळेधारकांनी जवळपास २४ लाख रु पये सेवा शुल्क म्हणून रक्कम जमा केलेली आहे. दरम्यान, बाजार समितीने सुरू केलेल्या कारवाईविरोधात व्यापाºयांची बैठक होणार असल्याचेही समजते.
पुन्हा नव्याने वाद
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने सेवा शुल्क वसुलीसाठी गाळेधारकांविरु द्ध कारवाईची मोहीम सुरू केली असली तरी गाळेधारक व बाजार समिती यांच्यात पुन्हा नव्याने वाद उभा राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाने बोलून दाखविली आहे.