शेतकऱ्यांना नाडणा-या बॅँका, विक्रेत्यांवर प्रसंगी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 06:04 PM2019-07-01T18:04:18+5:302019-07-01T18:04:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शेतक-यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी सर्वांनी शेतक-यांनी सहकार्य करणे अपेक्षित असले ...

Action on farmers' narenda banks and vendors | शेतकऱ्यांना नाडणा-या बॅँका, विक्रेत्यांवर प्रसंगी कारवाई

शेतकऱ्यांना नाडणा-या बॅँका, विक्रेत्यांवर प्रसंगी कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देअनिल बोंडे : कृषी दिनानिमित्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतक-यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी सर्वांनी शेतक-यांनी सहकार्य करणे अपेक्षित असले तरी, काही बॅँकांकडून शेतक-यांना पीककर्ज देण्यासाठी अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत, तसेच बि-बियाण्यांमधून शेतक-यांची फसवणूक केली जात असल्याने शेतक-यांना नाडणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला आहे.
माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती तथा कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील रावसाहेब सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बोंडे पुढे म्हणाले, शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतक-यांनी गट शेती करण्यावर भर द्यावा. ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेती उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी गटशेतीच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करता येतील. शेतक-यांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करताना त्यातील नियमामध्ये लवचिकता आणून शेतक-यांना काही प्रमाणात स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. गावपातळीवर काम करणा-या कृषी सहायकाला ग्रामपंचायत कार्यालयात कामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच जिल्हा कृषी अधीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये विमा एजंट यांची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, कृषी आयुक्त शिवाजी धिवसे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रारंभी माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच कृषी विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या कृषी योजनांच्या पुस्तकाचे व घडीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत श्रीमती सुमन माधव कु-हाडे यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
चौकट====
शेतकºयांचा सत्कार
यावेळी जिल्ह्यातील शेतकºयांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यात मोतीराम लक्ष्मण गावित (सुरगाणा) सुरेश एकनाथ कळमकर, हेमंत पंडलिक पिंगळे, सागर सुरेश डोखळे (दिंडोरी), रवींद्र धनसिंग पवार, मनोहर प्रकाश खैरनार (मालेगाव), सुरेश नामदेव भोये, रामनाथ गोविंद वाघेरे (पेठ), विमल जगन आचारी, सुंदराबाई दामोधर वाघेरे (त्र्यंबकेश्वर), भाऊसाहेब गोविंद जाधव, कैलास बाबूराव बेंडकोळी, रामचंद्र पाहुजी गांगुर्डे (नाशिक), शिवनाथ भिकाजी बोरसे (चांदवड), वामन किसन भोये (त्र्यंबकेश्वर), अरुण बबनराव पवार (मालेगाव), उत्तमराव भागूजी ठोंबरे, शिवाजी पंडितराव बस्ते (चांदवड) व गणेश दामू मिसाळ (नाशिक), अरुण सखाराम दळवी (बागलाण), संदीप कारभारी आहेर (कळवण), रमेश शिवराम सरोदे (नांदगाव), प्रताप शिवाजी दाभाडे (येवला), हेमंत वसंत आहेर (देवळा), सोपान प्रतापराव वाघ (निफाड), कुणाल बाशोक घुमरे (सिन्नर), एकनाथ कचरू महाले (इगतपुरी) आदींना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच विविध पीकस्पर्धेत अंतर्गत साधारण ६९ शेतक-यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्तराजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अर्थ व बांधकाम समिती सभापती मनीषा पवार, कृषी सहसंचालक रमेश भताने, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ आदी उपस्थित होते.
 

Web Title: Action on farmers' narenda banks and vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.