घरमालकांनी भाडेकरुंची माहिती पोलीस ठाण्याला न देणाºयांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:08 AM2017-12-30T01:08:04+5:302017-12-30T01:09:21+5:30
नाशिक : घरमालकांनी भाडेकरुंची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे.
नाशिक : घरमालकांनी भाडेकरुंची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे. पंरतु अनेक घरमालक अशी माहिती पोलिसांना देत नसल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाडेकरूंची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी (दि.२९) भाडेकरूंबाबत माहिती न ठेवणाºया सहा घरमालकांवर कायदेशीर कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहे. नानावली भागातील बिलाल हमजेखान पठाण व बिपीन पुरुषोत्तम पटेल यांच्यासह द्वारका टाकळीरोड परिसरातील शंकरनगर को-आॅपरेटिव्ह सोसायटी विंग-१ येथील भास्कर एकनाथ अकोले (६०), म्हसरूळ टेक जठारवाडा भागातील नितीन दत्तात्रय जठार, काझीगढीतील निर्मला साईनाथ निरभवणे, पंचशीलनगर येथील जावेद मसूद खान (३१) या सहा घरमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरमालकांनी भाडेकरुंबाबत माहिती न दिल्यास यापुढेही अशीच कारवाई चालू राहणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील सर्व भाडेकरूंबाबत पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.