आॅक्सिजनसह औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 04:23 PM2020-09-27T16:23:29+5:302020-09-27T16:23:56+5:30

मालेगाव : शहर व तालुक्यातील एकही रुग्ण रेमडेसिव्हीर औषधापासून वंचित राहता कामा नये. तसेच आॅक्सिजनसह औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश घटना व्यवस्थापक तथा अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी पारित केले आहेत.

Action if artificial shortage of drugs with oxygen is created | आॅक्सिजनसह औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कारवाई

आॅक्सिजनसह औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कारवाई

Next
ठळक मुद्देनिकम : रेमडेसिव्हीर औषधापासून एकही रुग्ण वंचित राहता कामा नये

मालेगाव : शहर व तालुक्यातील एकही रुग्ण रेमडेसिव्हीर औषधापासून वंचित राहता कामा नये. तसेच आॅक्सिजनसह औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश घटना व्यवस्थापक तथा अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी पारित केले आहेत. रेमडेसिव्हीर या औषधाचा कोरोना रुग्णांसाठी तातडीचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. या औषधांचा पुरवठा रुग्णांना वेळेवर होणे अत्यंत आवश्यक आहे. या औषधांच्या विक्री व विनियोग यांचे योग्य समन्वय व संनियत्रण होणे अत्यंत गरजेचे असल्याने औषधांच्या साठ्यांचे संनियत्रण करण्यासह मालेगाव शहर व तालुक्यातील रुग्णांना रेमडेसिव्हीर औषधांचा पुरवठा वेळेवर उपलब्ध व्हावा यासाठी उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा व औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन देशपांडे यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मालेगाव येथील कोविड रुग्णालयांची रेमडेसिव्हीर या औषधांची दैनंदिन मागणी व उपलब्धता विचारात घेऊन आवश्यक मागणी घटना व्यवस्थापक व सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक विभाग यांच्याकडे पाठवून मागणीप्रमाणे औषधसाठा वेळेवर उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करावा, रेमडेसिव्हीर औषधाची विक्री करताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन संबंधित वितरण विक्रीच्या ठिकाणावरून होते किंवा नाही, गरजू रुग्णांना वेळेवर व योग्य किमतीत औषध उपलब्ध होते किंवा कसे याबाबत वेळोवेळी खात्री करावी. उपलब्ध साठ्याची माहिती विक्री ठिकाणाच्या दर्शनी भागात प्रदर्शित केली जाईल याबाबत खात्री करावी. औषध विक्री करणाºया पुरवठादारांकडून दररोज त्यांनी रेमडेसिव्हीर औषध विक्री केलेल्या रुग्णालयाचा तपशील प्राप्त करून घ्यावा. औषधाच्या किमतीबाबत किंवा उपलब्धतेबाबत तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार तत्काळ कारवाई करण्याचे निर्देशही या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Web Title: Action if artificial shortage of drugs with oxygen is created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.