लग्न समारंभात गर्दी जमविली तर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:20 AM2021-02-17T04:20:51+5:302021-02-17T04:20:51+5:30
नाशिक: राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्य शाससाने सुरक्षितता नियमावलींची कठोर अंमलजबावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना ...
नाशिक: राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्य शाससाने सुरक्षितता नियमावलींची कठोर अंमलजबावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने लग्न समारंभात होणाऱ्या गर्दीवर आता लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. मिशन बिगेन अंतर्गत सभा, समारंभांना शिथिलता देण्यात आली असली तरी गर्दीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने यापुढे कारवाई केली जाणाार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण पुन्हा आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांचा आढावा घेतला. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांिगतले की, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. कोरोना नियंत्रणातासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून लग्न समारंभांना परवानगी देण्यात आलेली आहे. सोहळ्याला शंभर पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, मास्क वापरण्यात यावा, शारीरीक अंतर राखले जावे, सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा असे नियम घालून देण्यात आलेेले आहे. मात्र त्याचे पालन होत नसल्याने आता यासाठी कठोर कारवाईची भुमिका घेण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याने जिल्ह्यात काटेकरोर अंमलबाजवणीसाठी कारवाई केली जाणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.
स्थानिक प्रशासन, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांना देखील याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. गर्दी मुळे कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असून नियमांचे पालन न करणाऱ्ंयांवर कारवाई केली जाणार आहे. सध्या लग्ससराई असल्याने अनेक ठिकाणी मोठी गर्दी केली जाते. त्यामुळे लॉन्स, हॉल्स येथे आता नजर ठेवली जाणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाडी असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
नियमांचे पालन न करणारी मंगलकार्यालयेन, लॉन्स, बन्क्वेंट हॉल यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जाईल त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अनलॉकच्या प्रक्रीेयेनंतर सर्वकाही सुरळीत झाल्याच्या अर्विभावात लोक वावरत आहेत.वास्तविक प्रत्येकाला मार्गदर्शक नियमावलींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मात्र नियमांचे पालन कुणीही करतांना दिसत नाही. मास्क वापराकडे देखील दुर्लक्ष झाल्याची गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने शासनाने विनाकास्क फिरणाऱ्यांवर देखील कारवाईच्या सुचना दिलेल्या आहेत.त्यामुळे आता विनामास्क, सुरक्षिततेचे अंतर या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.