क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:07 AM2019-06-11T01:07:00+5:302019-06-11T01:07:58+5:30
मालेगाव : सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची नोंदणी होणे गरजेचे आहे. या रुग्णांची माहिती ँ३३स्र२://ल्ल्र‘२ँं८.्रल्ल या संकेतस्थळावर देणे बंधनकारक आहे. अशा रुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मालेगाव : सुधारित राष्टय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांची नोंदणी होणे गरजेचे आहे. या रुग्णांची माहिती https:/nikshay.in या संकेतस्थळावर देणे बंधनकारक आहे. अशा रुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
खासगी रुग्णालयामध्ये क्षयरोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती शासनास कळविणे बंधनकारक असतानाही त्यांच्याकडून ही माहिती अनेकदा दिली जात नाही. खासगी दवाखाने, खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा, औषध निर्माते, अशासकीय संस्थांमार्फत चालविली जाणारी रुग्णालये व दवाखाने, सार्वजनिक दवाखाने, रुग्णालये आणि वैद्यकीय अधिकारी यांनी क्षयरुग्णांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक व खासगी रुग्णालये व वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांची नोंदणी न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. औषध विक्रेत्यांनीही क्षयरोगावरील औषधांच्या विक्रीसाठी विहित नमुन्यात माहिती न ठेवल्यास त्यांच्यावरही औषधे व प्रसाधने कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. क्षयरोग नियंत्रण कक्षक्षयरुग्णांना व इतर सर्वांना क्षयरोगासंदर्भातील सोयीसुविधांची माहिती होण्यासाठी सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १८००११६६६६ या टोल फ्री क्रमांकावर क्षयरोग हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. तसेच मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांना येत असलेल्या क्षयरुग्णांच्या नोंदणीविषयी अडचणीसंदर्भात मालेगाव येथील शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अमोल दुसाने यांनी केले आहे.