जनआरोग्यातून म्युकरमायकोसिसचा उपचार न केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:52+5:302021-05-31T04:11:52+5:30

नाशिक: जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असून, नाशिकमधील आठ रुग्णालयांत या आजरावर उपचार मोफत करण्यात येणार ...

Action if mucorrhoea is not treated by public health | जनआरोग्यातून म्युकरमायकोसिसचा उपचार न केल्यास कारवाई

जनआरोग्यातून म्युकरमायकोसिसचा उपचार न केल्यास कारवाई

Next

नाशिक: जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असून, नाशिकमधील आठ रुग्णालयांत या आजरावर उपचार मोफत करण्यात येणार आहे, असे असतानाही रुग्णालयांनी मोफत उपचार करण्यास नकार दिला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. दरम्यान, या व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घटना व्यवस्थापकाचीदेखील नियुक्ती करण्यात आलेली आहे.

म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. विशेेष म्हणजे म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचारासाठी लागणारी ‘अँटी फंगल’ आणि ‘एम्फोटेरीसिन बी’ इंजेक्शन ही औषधे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत रुग्णालयांना मोफत पुरविण्यात येत आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना योजनेत समाविष्ट रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होऊन उपचार घेणे आवश्यक आहे. सदर योजना ही कॅशलेस पद्धतीने राबविली जात असून योजनेचा लाभ घेण्याकरिता रुग्णालयात रुग्णांस भरती करतेवेळी कोणतेही रेशन कार्ड व आधारकार्ड या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे व ती कागदपत्रे रुग्णालयातील ‘आरोग्य मित्र’ यांच्याकडे सादर करावीत, असे जिल्हाधिकारी आवाहन मांढरे यांनी केले आहे.

कागदपत्रे रुग्णालयात दाखल होताना उपलब्ध नसल्यास रुग्णालयास तशी कल्पना व लेखी स्वरूपात कागदपत्रांची पूर्तता करण्याची हमी देऊन योजनेचा लाभ मिळविता येऊ शकतो. परंतु सदरील कागदपत्रे निर्धारित कालावधीत जमा करणे आवश्यक आहे. योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अथवा रुग्णालयाने योजनेचा लाभ नाकारल्यास रुग्णालयातील ‘आरोग्यमित्र’ अथवा तक्रार क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. मात्र या योजनेअंतर्गत कोरोना उपचाराच्या अनुषंगाने लागणाऱ्या महागड्या औषधांचा समावेश करण्यात आलेला नाही, याची रुग्ण आणि नातेवाइकांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी नमूद केले आहे.

रुग्णालयांनी योजनेचा लाभ नाकारल्यास रुग्णालयातील ‘आरोग्यमित्र’ अथवा एमडी इंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए संस्थेचे जिल्हा कार्यालय प्रतिनिधी डॉ. राहुल सोनवणे ८०९७५३८१५१, डॉ. समकीत साकला ८०९७५३८१५० यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. कामकाज पाहण्यासाठी घटना व्यवस्थापक म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) नीलेश श्रींगी यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. पंकज दाभाडे काम पाहणार आहेत. तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १५५३८८ किंवा १८००२३३२२०० यावर संपर्क साधवा, असेही आवाहन मांढरे यांनी केले आहे.

--इन्फो--

मोफत योजना देणारी रुग्णालये

- जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक

- एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घोटी

- डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, नाशिक

- सामान्य रुग्णालय, मालेगाव

- नामको चॅरिटेबल हॉस्पिटल, नाशिक

- व्होकार्ट हॉस्पिटल,नाशिक

- सह्याद्री हॉस्पिटल, नाशिक

- सिक्स सिग्मा हॉस्पिटल, नाशिक

Web Title: Action if mucorrhoea is not treated by public health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.