रुग्णांची माहिती दडविल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:06 PM2020-08-04T22:06:04+5:302020-08-05T00:54:22+5:30
मालेगाव : शहरातील खासगी डॉक्टरांना नॉन-कोविड रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक असले तरी त्यांनी कोरोना संशयित रुग्णांबाबत माहिती दडविल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त त्र्यंबक कासार यांनी दिली.

शहरातील नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे, मात्र जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळावे, घरातील आजारी व संशयित रुग्णांवर तत्काळ उपचार करावे, असे आवाहन महापौर ताहेरा शेख, आयुक्त कासार यांनी केले आहे. खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोनासदृश लक्षणे दिसल्यास संबंधित डॉक्टरांनी महापालिकेच्या केबीएच लॉ कॉलेजच्या केंद्रात संशयित रुग्णांना दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.