पीएम किसान योजनेच्या रक्कमा आठवड्यात परत न केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 09:04 PM2020-10-26T21:04:09+5:302020-10-27T00:30:38+5:30
लासलगाव : निफाड तालुक्यातील शासनाच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी म्हणुन शासनाची रक्कम घेतलेल्या आयकरपात्र १६४० लाभार्थीना अदा केलेल्या रक्कमा नोटीस दिलेल्या लाभार्थींनी येत्या सात दिवसात तलाठी कार्यालयात रोख अथवा धनादेशाने अदा करावी अन्यथा आयकरपात्र असुनही रक्कम घेऊन फसवणूक केल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहीती निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी दिली.

केंद्र सरकारने किसान सन्मान योजना २०१९ ही सुरू केली. निफाड तालुक्यातील ५५ हजार २७० शेतकरी बांधवांनी याकरीता नोंदणी केली. त्यातील आयकर खात्याच्या वतीने पडताळणी होऊन १६४० लाभार्थी हे आयकरपात्र आहेत असे दिसुन आले. त्यामुळे त्यांना अदा केलेल्या रक्कमा सात दिवसात तलाठी कार्यालयात रोख अथवा धनादेशाने जमा करून त्याची पावती घ्यावी.
या मुदतीनंतर शासनाची रक्कम फसवणुक करून खात्यावर घेतल्याबाबात गुन्हे दाखल करण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे तलाठी यांना सहकार्य करून त्वरीत रक्कम जमा करावी असे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले.