नाशिकरोडला बिंगो जुगाराच्या पैशावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 11:53 PM2018-09-08T23:53:22+5:302018-09-08T23:55:24+5:30

नाशिकरोड : अवैध धंदे व बिंगो बंद असल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा दोन दिवसांपूर्वी सुभाषरोड येथे बिंगो जुगार पैशाच्या वसुलीवरून दोन गटात झालेल्या मारामारीवरून फोल ठरला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Action on the money from bingo gambha in Nashik Road | नाशिकरोडला बिंगो जुगाराच्या पैशावरून हाणामारी

नाशिकरोडला बिंगो जुगाराच्या पैशावरून हाणामारी

Next
ठळक मुद्दे च्नाशिकरोड परिसरात सर्वत्र जुगार, मटका आदी अवैध धंदे सर्रासपणे सुरू

नाशिकरोड : अवैध धंदे व बिंगो बंद असल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा दोन दिवसांपूर्वी सुभाषरोड येथे बिंगो जुगार पैशाच्या वसुलीवरून दोन गटात झालेल्या मारामारीवरून फोल ठरला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गोसावीवाडी येथील शहानवाज मुश्ताफ सय्यद याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्वत: शहानवाज, चुलत भाऊ आदिल सय्यद व त्यांचा मित्र विशाल मानकर हे १५ दिवसांपूर्वी बिंगो नावाच्या जुगारावर दोन लाख ७० हजार रुपये जिंकले होते. जिंकलेले पैसे घेण्यासाठी गेल्या गुरुवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जियाउद्दीन डेपो येथे रिजवान रईस खान याने पैसे देण्यास नकार दिला. रिजवान, नियामत खान इरफान ऊर्फ इप्प्या याने शहानवाज याच्या डोक्यावर चॉपरने वार करून गंभीर दुखापत केली. शहानवाज याच्या सोबत असलेले आदिल सय्यद व वसीम सय्यद यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालधक्का रोड येथील अल्तम अजिम शेख याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास जियाउद्दीन डेपो अकबर सोडा शॉप येथे मित्र रिजवान खान बसलेला होता. यावेळी आदिल सय्यद, तौसीफ सय्यद, वसीम सय्यद, शानू सय्यद सर्व रा. गोसावीवाडी यांनी तेथे येऊन १५ दिवसांपूर्वी बिंगो जुगारावर हरलेले १ लाख ८० हजार रुपयांची मागणी करून ते पैसे न दिल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तोंडावर फायटर मारून जखमी केले. फिर्यादी अल्तमचा भाऊ इरफान व मामा नियामत खान यांनादेखील मारहाण करून दुकानाच्या गल्ल्यातील १२ हजार ९८० रुपये जबरी चोरी करून चोरून घेऊन गेले. तसेच संशयितांनी केलेल्या दगडफेकीत अश्पाक अन्सारी याच्या हाताला दुखापत झाल्या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध धंदे सर्रासपणे सुरू च्नाशिकरोड परिसरात सर्वत्र जुगार, मटका आदी अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. बिंगो नावाचा जुगार युवा पिढी मोबाइलवरून खेळत असून त्याची माहितीदेखील पोलिसांना आहे. मात्र अर्थपूर्ण संबंधामुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. फक्त वरिष्ठांना दाखविण्यासाठी छोट्या-मोठ्या कारवाया केल्या जातात.

Web Title: Action on the money from bingo gambha in Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.