पालिकेकडून कारवाई :  ‘हॉटेल किनारा’ जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:13 AM2018-04-05T00:13:22+5:302018-04-05T00:13:22+5:30

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मुंबई नाक्यावरील अनधिकृतपणे उभारण्यात आलेले हॉटेल किनारा जमीनदोस्त करण्याची कारवाई बुधवारी (दि. ४) सकाळी केली. नजराणा न भरलेल्या आणि येणे नसलेल्या जागेवर विनापरवाना बांधकाम उभे करण्यात आल्याने पालिकेमार्फत सदर कारवाई करण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाच्या सूत्रांनी दिली.

 Action by the municipal corporation: 'Hotel edge' landslide | पालिकेकडून कारवाई :  ‘हॉटेल किनारा’ जमीनदोस्त

पालिकेकडून कारवाई :  ‘हॉटेल किनारा’ जमीनदोस्त

Next

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मुंबई नाक्यावरील अनधिकृतपणे उभारण्यात आलेले हॉटेल किनारा जमीनदोस्त करण्याची कारवाई बुधवारी (दि. ४) सकाळी केली. नजराणा न भरलेल्या आणि येणे नसलेल्या जागेवर विनापरवाना बांधकाम उभे करण्यात आल्याने पालिकेमार्फत सदर कारवाई करण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, राजकीय वरदहस्त लाभल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या बांधकामाला अभय मिळत होते. परंतु, महापालिका आयुक्तांनी याबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेशित केल्यानंतर सदर अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले.  महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक सकाळी १० वाजेच्या सुमारास मुंबई नाक्यावर येऊन धडकले. हॉटेल किनाराचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठीच हा फौजफाटा आल्याची खबर हॉटेलचालक-मालकांना लागल्यानंतर त्यांनी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणत्याही स्थितीत अनधिकृत बांधकाम हटविण्याचा निर्धार सोनवणे यांनी केला. त्यामुळे नाइलाज झालेल्या हॉटेलचालकाने स्वत:हून हॉटेलमधील साहित्य हलविण्यास सुरुवात केली. बांधकाम विभागाकडून जेसीबी येऊन पोहोचल्यानंतर अतिक्रमणविरोधी पथकाने अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली. यावेळी पत्र्याच्या शेडसह पक्के बांधकाम हटविण्यात आले. सदर हॉटेल हे प्रताप पांडुरंग गायकवाड यांच्या मालकीचे असून, ते सुरेश शेट्टी यांना चालविण्यास देण्यात आले होते. दरम्यान, नगररचना विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जागेचा ले-आउट झालेला नाही. ती जागा पीस आॅफ लॅण्ड या स्वरूपातील आहे. सदर जागेचा नजराणा भरलेला नाही. त्यातच जागेवर विनापरवानगी बांधकाम करत व्यावसायिक कारणासाठी जागेचा वापर केला जात असल्याने ते अनधिकृत ठरविण्यात आले. त्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर कारवाईप्रसंगी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण स्वत: ठाण मांडून होते.
चर्चा अन् शेलारांचा इन्कार
सदर हॉटेलमध्ये राष्टÑवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांची भागीदारी असल्याची आणि गेल्या महासभेत शेलारांनी केलेल्या भाषणामुळे अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली गेल्याची चर्चा शहरात पसरली होती. याबाबत गजानन शेलार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर हॉटेलचा आणि जागेचा आपला काही संबंध नसल्याचे सांगितले. त्यापाठीमागे आपली स्वत:ची जागा असून, हॉटेलवरील कारवाई चुकीच्या पद्धतीने झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, जागामालक प्रताप गायकवाड यांनी सूचना न देता झालेल्या कारवाईबद्दल खेद व्यक्त करत, या कारवाईत नगरसेवक गजानन शेलार यांचाच हात असल्याचा आरोप केला आहे. नगरसेवकाच्या दबावाखाली येऊन सदर कारवाई झाल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

Web Title:  Action by the municipal corporation: 'Hotel edge' landslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.