नाशिक पुरवठा खात्याची कारवाई विधीमंडळात चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:13 PM2018-03-22T15:13:39+5:302018-03-22T15:13:39+5:30

नाशिक तहसिल कार्यालयातील पुरवठा खात्याबाबत केल्या जाणा-या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी पुरवठा खात्याचे दप्तर तपासणी केली असता त्यात अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका निदर्शनास आल्या होत्या व त्यावरून पुरवठा अव्वल कारकूनला निलंबीत करण्यात आले आहे

Action of Nashik Supply Department in the Legislative Assembly | नाशिक पुरवठा खात्याची कारवाई विधीमंडळात चर्चेत

नाशिक पुरवठा खात्याची कारवाई विधीमंडळात चर्चेत

Next
ठळक मुद्देअधिकारी मोकळे : आधार सिडींगचा प्रश्न उपस्थित पुरवठा अव्वल कारकूनला निलंबीत करण्यात आले

नाशिक : नाशिक तहसिल कार्यालयातील पुरवठा खात्यातील अनागोंदी कारभाराबद्दल कर्मचारी निलंबीत करण्याची कार्यवाही केली असली तरी, या साऱ्या प्रकरणात दोषी अधिका-यांवर काय कारवाई केली तसेच आधार सिडींगचे काम करणा-या ठेकेदाराला काम पुर्ण न करताच देयके कशी अदा केली आदी पुरवठा खात्याशी निगडीत प्रश्न राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुरवठा खाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
नाशिक तहसिल कार्यालयातील पुरवठा खात्याबाबत केल्या जाणा-या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिका-यांनी पुरवठा खात्याचे दप्तर तपासणी केली असता त्यात अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका निदर्शनास आल्या होत्या व त्यावरून पुरवठा अव्वल कारकूनला निलंबीत करण्यात आले आहे. कारवाईचा धागा पकडत आमदार सीमा हिरे यांनी या संदर्भात अधिवेशनात प्रश्न विचारला आहे. पुरवठा खात्याच्या अनागोंदी कारभाराबद्दल कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली असेल तर अधिका-यांवर काय कारवाई केली अशी विचारणा करण्यात आली आहे. या शिवाय पुरवठा विभागाने आधार सिडींगचे कामे दिलेल्या ठेकेदाराने काम पुर्ण केलेले नसताना त्याला देयके कशी अदा केली, आधार सिडींगसाठी रेशन दुकानदारांकडून वेळोवेळी पैसे घेण्यात आलेले असतानाही काम पुर्ण का होऊ शकले नाही अशी विचारणा करण्यात आली आहे. त्याच बरोबर पॉस यंत्राबाबत रेशन दुकानदारांच्या असलेल्या तक्रारींबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. नाशिक शहर धान्य वितरण अधिका-यांच्या मनमानी कारभाराबाबत देखील रेशन दुकानदारांच्या असलेल्या तक्रारींवर काय कार्यवाही करण्यात आली अशी विचारणा करण्यात आली आहे. विधीमंडळ अधिवेशनातच थेट पुरवठा खात्याच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने पुरवठा खाते चर्चेत आले आहे.

Web Title: Action of Nashik Supply Department in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.