कोरोना प्रतिबंधासाठी कृती आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:47 PM2020-03-21T23:47:49+5:302020-03-21T23:48:41+5:30
नाशिक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील सज्जतेचा आढावा घेतला. नाशकात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास महानगरासह जिल्हाभरात सर्वत्र सज्जता असावी, या दृष्टीने संयुक्त पाहणी दौरा करून कृती आराखडा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील सज्जतेचा आढावा घेतला. नाशकात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास महानगरासह जिल्हाभरात सर्वत्र सज्जता असावी, या दृष्टीने संयुक्त पाहणी दौरा करून कृती आराखडा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.
कोरोना या जागतिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात असून, कोरोना संसर्गीत आढळल्यास त्यावर करायचे उपचार व उपाययोजना संदर्भातील एक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे व महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक शहरातील संपूर्ण पूर्वतयारीचा आढावा घेतला. तपोवन येथील शासकीय इमारत, बिटको हॉस्पिटलजवळची इमारत, जिल्हा सामान्य रु ग्णालय तसेच डॉ. झाकीर हुसेन रु ग्णालय येथील पूर्वतयारीची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे व संबंधित यंत्रणेच्या अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या.
यावेळी संभाव्य रुग्णांच्या विलगीकरणाची व्यवस्था त्याचप्रमाणे निरीक्षणाखालील संभावित रु ग्ण कोरोना संसर्ग झाल्याचे आढळल्यास त्यावर करावयाच्या उपाययोजना, उपचार करण्याची व्यवस्था या सर्व बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला. या सर्व माहितीच्या आधारे एक कृती आराखडा तत्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी संबंधितांना दिल्या. रु ग्णांशी साधला संवादजिल्हा सामान्य रु ग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये निरीक्षणाखाली असलेल्या तीन रुग्णांशी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुसंवाद साधला. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आपल्याशी सुसंवादासाठी आल्याने कोरोना संशयिताना समाधान वाटले. जिल्हाधिकारी व प्रशासनाने त्या ठिकाणी असलेल्या सेवा, शुश्रूषा व व्यवस्थेबद्दल विचारणा करीत आढावा घेतला.