रावळगाव साखर कारखान्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:11 AM2021-06-19T04:11:19+5:302021-06-19T04:11:19+5:30
सुमारे २ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रावळगाव येथील एस. जे. शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनावर जप्तीची नामुष्की ओढावली आहे. साखर कारखान्याने २०२१ ...
सुमारे २ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रावळगाव येथील एस. जे. शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनावर जप्तीची नामुष्की ओढावली आहे. साखर कारखान्याने २०२१ च्या हंगामात १ लाख ४६ हजार ७४९ मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. या हंगामाची निव्वळ एफआरपी रक्कम २५३६.६५ प्रति मेट्रीक टन इतकी होती. काही ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यात आली होती तर २ हजार ४०० शेतकऱ्यांची रक्कम बाकी होती. ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या तरतुदींच्या हंगामात गाळप केल्यानंतर उसाचे १४ दिवसांत किमान एफआरपीप्रमाणे पुरवठादारांना पेमेंट अदा करणे बंधनकारक आहे. वेळेत रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत साखर आयुक्तांनी २२ सप्टेंबर २०२० रोजी थकीत रक्कम अदा करण्याचा आदेश दिला होता. तहसीलदार राजपूत यांनी कारवाई करून मुद्देमाल सील केला. यावेळी मंडल अधिकारी गणोरे, कारखान्याचे ऑडिटर अभ्यंकर, सरपंच महेश पवार, उपसरपंच भरत आखाडे, युवराज कदम, तलाठी महाले आदी उपस्थित होते.