कारवाई : रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या टपऱ्या हटविल्याने परिसर झाला मोकळा सिन्नरला रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:09 AM2018-04-11T00:09:59+5:302018-04-11T00:09:59+5:30
सिन्नर : येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या पानटपºया, हातगाडे, अंडाभुर्जीची दुकाने अशी अतिक्रमणे नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवली.
सिन्नर : येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या पानटपºया, हातगाडे, अंडाभुर्जीची दुकाने अशी अतिक्रमणे नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवली. दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविल्याने परिसर मोकळा झाला. बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीस लागून व्यवसाय थाटलेल्या व्यावसायिकांनी आपापली अतिक्र मणे स्वत:हून काढून घ्यावीत यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पालिकेच्या वतीने दवंडी देऊन आवाहन केले जात होते. मात्र या आवाहनास प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान नगरपालिकेचे करनिरीक्षक तथा कार्यालय अधीक्षक विष्णू क्षत्रिय, अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख नीलेश बाविस्कर यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचा ताफा बसस्थानक परिसरात हजर झाला. वाजे विद्यालयास लागून असलेल्या रस्त्यावर एका बाजूने व्यवसाय करावा, दुसरी बाजू मोकळी सोडावी, असे नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांनी सांगितले आहे. त्यामुळे आम्ही अतिक्रमणे काढणार नाही. मुख्याधिकारी आल्यानंतर काय तो निर्णय घेऊ, अशी ठाम भूमिका व्यावसायिकांनी घेतल्याने प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम येथे थांबविण्यात आली. फुले परिसरातील सुमारे १५-२० टपºया हटविल्याने महात्मा फुले पुतळ्याने मोकळा श्वास घेतला. टपºयाखाली टाकलेला भरावही नगरपालिकेच्या जेसीबीच्या सहाय्याने दूर करून रस्ता साफ करण्यात आला.
दरम्यान, काजीपुरा भागात महात्मा फुले विद्यालयाच्या संरक्षक भिंतीस लागून असलेल्या भंगारांची दुकाने हटवून हा रस्ता मोकळा करण्यात आला. ४ ट्रॅक्टर, १ जेसीबी, ५० कर्मचारी असा ताफा अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेने सज्ज ठेवला होता. मात्र बहुतेक व्यावसायिकांनी नुकसान टाळण्यासाठी स्वत:हून टपºया, गाडे हटविले. अतिक्रमण मोहिमेत आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, अशोक कट्यारे, भूषण नवाल, दीपक भाटजिरे, विजय वाजे, जगदीश वांद्रे, सतीश शिंदे, मंगेश आहेर, कैलास शिंगोटे आदींसह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.