विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:24 PM2020-04-09T22:24:56+5:302020-04-09T23:13:55+5:30

कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करून ३४०० रुपये दंड वसूल करून दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

Action on rotators without cause | विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई

लासलगाव येथील वाहनचालकाविरु द्ध कारवाई करताना लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व पोलीस कर्मचारी.

Next
ठळक मुद्देलासलगाव : दंड वसुलीसह दोन दुचाकी जप्त

लासलगाव : कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करून ३४०० रुपये दंड वसूल करून दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे, पो. हवा. नंदकुमार देवढे, पो. ना. संतोष इप्पर, पो. कॉ. प्रदीप आजगे व भगवान सोनवणे यांनी केली. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. विनाकारण रस्त्यावर वावरताना मिळून आल्यास यापुढे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असे रंजवे यांनी सांगितले.

Web Title: Action on rotators without cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.