घरपट्टी वसुलीसाठी जप्ती वॉरंटसह कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:52 AM2019-03-27T00:52:01+5:302019-03-27T00:52:17+5:30
मार्च अखेरमुळे महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी धडाका लावला असून, आतापर्यंत १०९ कोटी रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे.
नाशिक : मार्च अखेरमुळे महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी धडाका लावला असून, आतापर्यंत १०९ कोटी रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. मार्च अखेरीस अवघे पाच दिवस शिल्लक असताना उद्दिष्टपूर्ती होत नसल्याने महापालिकेने आता जप्ती वॉरंटसह अन्य कारवायांना सुरुवात केली असून, पाच दिवसांत किमान सहा कोटी रुपये वसूल होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी विविध प्रकारचे व्यावसायिक, मिळकतधारक महापालिकेत अधिकारी वर्गाकडे धाव घेत असून, कारवाई टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
चालू आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्तांनी सुमारे २५६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट घरपट्टीसाठी ठेवले होते; परंतु जुन्या मिळकती करवाढीच्या प्रस्तावात महासभेने घट करून सर्व प्रकारच्या मिळकतींना सरसकट सोळा टक्के कर आकारणी करण्याचा ठराव केला. त्यातच माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नव्या मिळकतींवर कर वाढविण्यासाठी वार्षिक भाडेमूल्य वाढविले आणि त्यांनतर मोकळ्या बखळ जागांचेदेखील दर वाढविले. तसेच मिळकतीचे सामासिक क्षेत्र, वाहनतळ आणि शेतीक्षेत्रावर करवाढ लागू केली. त्याचप्रमाणे महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या ५९ हजार मिळकतींकडून नवीन भाडेमूल्यानुसार कर आकारणी केली जाणार होती; परंतु या सर्व बाबींना वर्षभर विरोध होत राहिला. त्यातच वार्षिक भाडेमूल्य आकारणीच्या
लॉन्स, वीटभट्टीचालकांना नोटिसा
महापालिकेने अलीकडेच मूल्यांकन करून लॉन्स, लाकडाच्या वखारी आणि वीटभट्टी व्यावसायिकांना दहा ते वीस लाख रुपयांच्या नोटिसा बजावल्या. त्यात मूल्यांकनाच्या अगोदर सहा वर्षे कालावधीपर्यंत वसूल करण्याच्या नादात ज्यावेळी संबंधित व्यवसाय होत नव्हते त्यांनादेखील नोटिसा बजावल्याचे काहींचे म्हणणे असून, त्यामुळे त्यांनी महापालिकेत कर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, वसुलीच्या वेळी चुकीच्या कर आकारणीत दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव येत असून, ते प्रशासनाकडून फेटाळण्यात येत आहेत.