ध्वनिप्रदूषण केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:10 AM2017-09-01T00:10:11+5:302017-09-01T00:10:46+5:30
गणेशोत्सव काळात गणेश मंडळांच्या मंडपातील ध्वनिक्षेपकावर पूर्वीच्या तुलनेत बरीच मर्यादा आली असली तरीही गणरायाची स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी डीजेमधून निघणारा कर्णकर्कश आवाज अजूनही निघतोच आहे.
कळवण : गणेशोत्सव काळात गणेश मंडळांच्या मंडपातील ध्वनिक्षेपकावर पूर्वीच्या तुलनेत बरीच मर्यादा आली असली तरीही गणरायाची स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी डीजेमधून निघणारा कर्णकर्कश आवाज अजूनही निघतोच आहे. कानठळ्या बसविणाºया या आवाजावर नियंत्रण आणण्यासाठी ध्वनिप्रदूषण अधिनियम तयार करण्यात आला असून, हा अधिनियम दरवर्षी बासनात गुंडाळून ठेवला जातो आणि दरवर्षी आवाजाची मर्यादा ओलांडली जाते.
यावर्षी मात्र कळवण पोलिसांनी ध्वनिप्रदूषण विरोधात कडक भूमिका घेतली असून, कळवण शहरात व तालुक्यात समाजप्रबोधन केले जात आहे. दंडात्मक कारवाईसह तुरुंगवासाचा इशारा कळवण पोलीस प्रशासनाने दिला आहे.
ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम व ध्वनिप्रदूषण एक समस्या या विषयावर कळवण पोलीस स्टेशनने आरकेएम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व जानकाई माध्यमिक विद्यालयात निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेऊन ध्वनिप्रदूषण समाजासाठी किती हानिकारक असल्याचे प्रबोधन केले. या स्पर्धेत उच्च माध्यमिक विद्यालय गटात ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम या विषयात प्रगती शरद देवरे ( प्रथम), निकीता बंडोप्पा बोईनवाड (द्वितीय), सुनील कैलास सोनवणे (तृतीय), शुभम भाऊसाहेब पगार ( उत्तेजनार्थ), दीपक गंगाराम ठाकरे (उत्तेजनार्थ) तर ध्वनिप्रदूषण एक समस्या या विषयावर वकृत्व स्पर्धत जयश्री साहेबराव ठाकरे (प्रथम), तुप्ती हेमंत देवघरे (द्वितीय), रोशन शरद खैरनार (तृतीय), चारु शीला जगन्नाथ पाटील (उतेजनार्थ), बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा.बी. एच. भारती, प्रा.एच. आर. गवळी, प्रा.एन. व्ही. निकम, प्रा.पी. बी.नेरकर, प्रा.जी. डी. निरगुडे, प्रा. के. डी. जाधव यांनी काम पाहिले.
जानकाई माध्यमिक विद्यालयात ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम या विषयावरील निबंध स्पर्धत १६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात इयत्ता पाचवी ते सातवी गटात श्वेता हरी गवळी (प्रथम), वैष्णवी सुनील पाटील (द्वितीय), नंदिनी संदीप पगार (तृतीय), स्नेहल किशोर धांडे (उत्तेजनार्थ), आदिती प्रमोद येवला (उत्तेजनार्थ) तर इयत्ता आठवी ते दहावी गटात प्रीती शरद निकम (प्रथम), रितिका नितीन पाटील (द्वितीय), मनाली राजेंद्र अमृतकार (तृतीय), रिया संजय
पगार (उत्तेजनार्थ), आकांक्षा महेंद्र लोखंडे (उत्तेजनार्थ) बक्षीस देण्यात आले.