नाशिकरोडला २८ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:21 PM2021-03-18T23:21:59+5:302021-03-19T01:32:15+5:30
नाशिकरोड : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणारे, नागरिक, व्यावसायिक यांच्यावर नाशिकरोडला पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई सुरू केली असून, त्यात २८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नाशिकरोड : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणारे, नागरिक, व्यावसायिक यांच्यावर नाशिकरोडला पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई सुरू केली असून, त्यात २८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत असून बाजारात विनामस्क फिरणे, गर्दी करणे, सुरक्षित अंतर न ठेवणे या प्रकारांना अटकाव घालण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. बुधवारी दिवसभरात ६७ जणांवर कारवाई करण्यात आली. गुरुवारीही कारवाई सुरू होती. सहायक पोलीस आयुक्त समिर शेख, वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली, महापालिकेचे विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. वास्को चौक, शिवाजी पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळा, बसस्थानक, मुक्तिधाम, बिटको चौक आदी ठिकाणी कारवाई करून विना मास्क फिरणा-या नागरिकांना पकडून पोलीस वाहनात बसविण्यात आले. महापालिका रुग्णालयात ३९ जणांची आरटीपीसी चाचणी घेण्यात आली. त्यांना अहवाल येईपर्यंत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. २८ जणांवर विना मास्क प्रकरणी करण्यात आली. प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, यापुढेही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी दिली आहे.