अनकाई किल्ल्यावर ३२ पर्यटकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:29 PM2020-08-07T22:29:43+5:302020-08-08T01:04:10+5:30

येवला : कोरोनामुळे लागू असणाऱ्या लॉकडाऊन व संचारबंदीने सर्वत्र पर्यटन बंद झाले असताना तालुक्यातील अनकाई येथील किल्ल्यावर काही शौकीन ...

Action taken against 32 tourists at Ankai fort | अनकाई किल्ल्यावर ३२ पर्यटकांवर कारवाई

अनकाई किल्ल्यावर बंदी असताना फिरण्यासाठी आलेल्या युवकांवर कारवाईप्रसंगी पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे व पोलीस कर्मचारी.

googlenewsNext
ठळक मुद्देसंचारबंदीचे उल्लंघन : तीन जणांवर गुन्हा दाखल

येवला : कोरोनामुळे लागू असणाऱ्या लॉकडाऊन व संचारबंदीने सर्वत्र पर्यटन बंद झाले असताना तालुक्यातील अनकाई येथील किल्ल्यावर काही शौकीन पर्यटनासाठी आले होते. किल्ल्यावरील गर्दी पाहून दाखल झालेल्या पोलिसांनी ३२ पर्यटन शौकीनांना दंडूक्याचा प्रसाद देण्याबरोबरच त्यांच्याकडून नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान तीन जणांवर कलम १८८ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पावसाळा सुरू झाला की, हिरवळीने नटलेला अनकाई किल्ला परिसर भाविक व पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाऊनमध्ये बंदी असतानाही रविवारी (दि.६) किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी झाली. काही जण तर मौजमजा करीत होते. विशेष म्हणजे यात सिन्नर, संगमनेर, वैजापूर, नांदगाव, मनमाड आदी गावातील पर्यटक होते. याची माहिती मिळताच किल्ल्यावर पोलिस दाखल झाले. त्यांनी काहींना उठबशा काढण्याची शिक्षा केली, काहींना दंडुक्याचा प्रसाद दिला. काही जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी हौशी पर्यटकांची चांगलीच कानउघडणी केली. सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, उज्वलसिंग राजपूत, वाहतूक पोलिस एच. डी. पवार, भालके, होमगार्ड माळी, मुलानी, करवर, देवकर आदींनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली.
पावसाळा सुरू झाला की, हिरवळीने नटलेला अनकाई किल्ला परिसर भाविक व पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातो.
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाऊनमध्ये बंदी असतानाही रविवारी (दि.६) किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी झाली. विशेष म्हणजे यात सिन्नर, संगमनेर, वैजापूर, नांदगाव, मनमाड आदी गावातील पर्यटक होते. माहिती मिळताच किल्ल्यावर पोलिस दाखल झाले. त्यांनी काहींना उठबशा काढण्याची शिक्षा केली, काहींना दंडुक्याचा प्रसाद दिला. काही जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी हौशी पर्यटकांची चांगलीच कानउघडणी केली.

Web Title: Action taken against 32 tourists at Ankai fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.