धनादेश न वटल्यास कारवाई
By Admin | Published: April 23, 2017 01:42 AM2017-04-23T01:42:05+5:302017-04-23T01:42:15+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेने मक्तेदारांना दिलेले धनादेश वटत नसल्याने हे धनादेश न वटल्यास जिल्हा बॅँकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला आहे.
नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्हा बॅँकेचा पाय दिवसागणिक खोलात जात आहे. जिल्हा परिषदेने मक्तेदारांना दिलेले धनादेश वटत नसल्याने हे धनादेश न वटल्यास जिल्हा बॅँकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला आहे. यापूर्वीच सेवानिवृत्तांचे वेतन जिल्हा परिषदेने जिल्हा बॅँकेकडून काढून अन्यत्र वर्ग केले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांच्या स्वाक्षरीने बुधवारी (दि. १९) जिल्हा परिषदेने एक पत्र जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांना पाठविले आहे. वसुली न झाल्याने व ३४१ कोटींच्या नोटा बदलून न दिल्याने जुन्या नोटा पडून असल्याने जिल्हा बॅँकेची आर्थिंक कोेंडी झालेली आहे.
या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी जिल्हा बॅँकेचे
प्रयत्न सुरू आहे. परंतु बॅँकेतील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. तसेच
मक्तेदारांचे धनादेश वटत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच कर्मचारी
व मक्तेदारांच्या तक्रारी वाढतच
आहे.
यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गेल्या आठवड्यातच जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट यांना बोलावून आर्थिक व्यवहार सुरळीत करावे, अन्यथा खाते बदलण्याचा इशारा दिला होता.
हा इशारा देऊनही बॅँकेचे कामकाज जैसे थेच राहिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे जिल्हा बॅँकेतील खाते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)