पाच पथकांनी केली कारवाई
By Admin | Published: June 17, 2015 01:55 AM2015-06-17T01:55:40+5:302015-06-17T01:56:36+5:30
पाच पथकांनी केली कारवाई
नाशिकमधील भुजबळ फार्म, येवला व मनमाड येथील निवासस्थाने व संपर्क कार्यालयांवर छापा टाकण्यासाठी एसीबीने पाच पथकांची निर्मिती केली होती़ त्यामध्ये तीन पोलीस उपअधीक्षक, नऊ पोलीस निरीक्षक, पाच व्हिडीओग्राफर व ३३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता़ भुजबळ फार्म येथील चौकशीप्रसंगी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक किशोर मोरे, पाच पोलीस निरीक्षक, तीन व्हिडीओग्राफरचा समावेश होता़ तर येवला व मनमाड येथे दोन पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षक, दोन व्हिडीओग्राफर व कर्मचाऱ्यांचा समावेश होता़