‘रोलेट’ इन्स्टॉल करून देणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:43 AM2019-12-20T00:43:11+5:302019-12-20T00:43:55+5:30
मोबाइलमध्ये रोलेट, बिंगो यांसारखे जुगाराचे खेळ इन्स्टॉल करून देत जुगाऱ्यांना पैशांच्या मोबदल्यात पॉइंट देणाºयांविरुद्ध आयुक्तालयातील अवैध धंदे कारवाई विरोधी पथकाने छापा मारला. कॉलेजरोडवरील एस. के. ओप मॉलच्या तळमजळ्यात हा नवीनच अवैध धंदा सुरू असल्याचे गुरुवारी (दि.१९) उघडकीस आले. याप्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : मोबाइलमध्ये रोलेट, बिंगो यांसारखे जुगाराचे खेळ इन्स्टॉल करून देत जुगाऱ्यांना पैशांच्या मोबदल्यात पॉइंट देणाºयांविरुद्ध आयुक्तालयातील अवैध धंदे कारवाई विरोधी पथकाने छापा मारला. कॉलेजरोडवरील एस. के. ओप मॉलच्या तळमजळ्यात हा नवीनच अवैध धंदा सुरू असल्याचे गुरुवारी (दि.१९) उघडकीस आले. याप्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉलेजरोडवरील एका दुकानात मोबाइलमध्ये फन रोलेट, बिंगो हे जुगाराचे खेळ इन्स्टॉल करून दिले जातात. त्यामोबदल्यात पॉइंट दिले जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना मिळाली. त्यांनी अवैध धंदे कारवाई पथकाला याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांच्या पथकाने छापा मारला. यावेळी संशयित जोगंंदर उर्फपप्पू रघुनंदन शहा हे त्याच्या गाळ्यात इंटरनेटच्या माध्यमातून जुगाºयांना आॅनलाइन पद्धतीने खेळला जाणारा जुगाराचे विविध ‘गेम्स’ डाउनलोड करून देत असताना आढळून आले. तसेच जुगाºयांकडून पैसे घेऊन त्यांना पॉइंट दिले जात असल्याचे यावेळी उघडकीस आले. पोलिसांनी या ठिकाणाहून १ लाख ३५ हजार रु पयांची रोकड, वाहन, जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख ८९९ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.