तिघा नामांकित टेक्सटाईल दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:32+5:302021-03-28T04:14:32+5:30
मनपा पंचवटी विभागाचे विभागीय अधिकारी विवेक धांडे, सहायक अधीक्षक भूषण देशमुख, राजेश सोनवणे, सचिन गवळी, राहुल बोटे, प्रकाश उखाडे ...
मनपा पंचवटी विभागाचे विभागीय अधिकारी विवेक धांडे, सहायक अधीक्षक भूषण देशमुख, राजेश सोनवणे, सचिन गवळी, राहुल बोटे, प्रकाश उखाडे हे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करीत असताना हिरावाडीतील गुंजाळबाबानगर, आडगाव शिवारातील दोन टेक्सटाईल दुकाने बाहेरून शटर बंद तर आत ग्राहक असल्याचे निदर्शनास येताच दुकानदारांवर कारवाई करीत १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. शासनाचे आदेश धुडकावून दुकानदारांनी दुकाने सुरू ठेवल्याचे यापुढे आढळून आल्यास संबंधित दुकाने पुढील आदेश येईपर्यंत सील करण्याबाबत प्रशासनाला पत्र देणार, असे सूत्रांनी सांगितले.
इन्फो====
मद्य विक्रेत्याची दादागिरी
सायंकाळी ७ नंतर जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद करण्याबाबत प्रशासनाने आदेश दिले आहे. मनपा प्रशासन सायंकाळी वाहन फिरवून जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद करण्याबाबत सूचना देतात. सायं. ७ नंतर काही देशी व विदेशी मद्य विक्री दुकाने सुरू राहतात. कर्मचारी दुकान वेळेत बंद करा सांगण्यासाठी गेले असता संबंधित मद्यविक्री करणारे थेट मनपा पथकावर दादागिरी करीत असून, त्यासाठी राजकीय दबाब टाकत असल्याच्या तक्रारी आहेत.