अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 15:38 IST2020-02-27T15:38:08+5:302020-02-27T15:38:40+5:30
सटाणा : तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारात गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणाºया ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून रंगेहाथ पकडले .

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई
सटाणा : तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारात गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणाºया ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून रंगेहाथ पकडले . ही कारवाई आज गुरु वारी (२७) सकाळी सात वाजेच्या सुमारास करण्यात आली .बागलाण तालुक्यातील गिरणा नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात असून ब्राह्मणगाव या परिसरातून जाणार्या गिरणा नदी पात्रात अवैध वाळू ट्रॅकटरच्या ट्रॉलीत भरून चोरीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना मिळाल्यानंतर तलाठी देवकाते ,मेजर मच्छिंद्र मोर यांचे पथक घटनास्थळी पोहचल्यावर अधिक चौकशी केली असता ट्रॅक्टर चालक व मालक अवैधरित्या वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. ट्रॅक्टर वर जप्तीची कार्यवाही करून तहसील कार्यालायत आणले असून याप्रकरणी १ लाख ३१ हजार ५०० रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.