आंदोनकर्त्यांवर कारवाईचा बडगा ; मंडप, निषेधाचे फलक जप्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:47 AM2018-04-17T00:47:55+5:302018-04-17T00:47:55+5:30
आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजारात आमरण उपोषण करीत असलेल्याल आंदोनकर्त्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, सोमवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मनपा प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात येथील मंडप, निषेधाचे फलक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गंगापूररोड : आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजारात आमरण उपोषण करीत असलेल्याल आंदोनकर्त्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, सोमवारी (दि.१६) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान मनपा प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात येथील मंडप, निषेधाचे फलक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. मनपाच्या या कारवाई विरोधात मात्र आंदोलकांमध्ये संतापाचे वातावरण असून, लोकशाहीने व शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या कारवाईनंतरही भाजीविक्रेते आंदोलक अजूनही आपल्या निर्णयावर ठाम असून, आंदोलन सुरूच ठेवले आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या अध्यक्ष हिमगौरी आडके व विक्रेत्यांची बैठक झाली. यासंदर्भात तोडगा निघेल असे आश्वासन आडके यांनी दिले.