दांडी बहाद्दर निवडणूक कर्मचार्यांवर होणार कारवाई ; ५१ कर्मचार्यांना मिळणार नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 05:39 PM2021-01-16T17:39:02+5:302021-01-16T17:39:32+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या ५१ शिक्षकांनी दांडी मारून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. या प्रकरणी शिक्षकांवर कारवाईसाठी बागलाणचे निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता यांनी गटशिक्षणाधिकारी यांना आदेश दिल्याने दांडी बहाद्दर शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

बागलाण तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित करण्यात आल्यानंतर निवडणूक केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी इत्यादी कामांसाठी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी लेखी आदेश देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने बागलाण तालुक्यातील शिक्षिकांना निवडणूक प्रक्रिया पार पडण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षणासाठी भाक्षी रोड येथील गुरु प्रसाद मंगल कार्यालय येथे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी म्हणून आदेशित करण्यात आले होते. तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार असल्याने ११ जानेवारी रोजी पारित केलेल्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहून मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी म्हणून निवडणूक केंद्रांवर जाण्यासाठी टाळाटाळ न करता हजर राहून निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कायद्याने बंधनकारक होते.
मात्र तब्बल ५१ कर्मचार्यांनी गैरहजर राहून निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली. संबंधित शिक्षकांना नोटीस बजावणेकामी कोणताही हलगर्जीपणा केल्यास अथवा टाळाटाळ केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम १३४ अन्वये कारवाई करण्याचा इशारा गुप्ता यांनी दिला आहे.