चंदनचोरांची टोळी सक्रिय; तीन वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:32 AM2019-06-30T00:32:43+5:302019-06-30T00:33:26+5:30

मागील काही दिवसांपासून शहर व परिसरात चंदनचोरांची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. पंधरवड्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाचे वृक्ष कापून नेले होते.

 Activists of Chandanchor's gang; Slaughter of three trees | चंदनचोरांची टोळी सक्रिय; तीन वृक्षांची कत्तल

चंदनचोरांची टोळी सक्रिय; तीन वृक्षांची कत्तल

googlenewsNext

नाशिक : मागील काही दिवसांपासून शहर व परिसरात चंदनचोरांची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. पंधरवड्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाचे वृक्ष कापून नेले होते. या घटनेचा तपास पूर्ण होत नाही तोच पुन्हा त्र्यंबकरोडवरील ‘गुलमोहर’ या शासकीय बंगल्याच्या आवारातून दोन तर भारतीय सैन्यदलाच्या गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट््स) व भारतीय तोफखाना केंद्राच्या आवारात घुसखोरी करून येथील चंदनाचा वृक्ष अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
चंदनवृक्ष शहर व परिसरात केवळ शासकीय निवासस्थाने व वसाहतींमध्ये बहरलेली असून, त्या वृक्षांवर चोरट्यांच्या टोळीने वक्रदृष्टी केली आहे. विशेष म्हणजे सरकारी आस्थापनांभोवती सुरक्षाव्यवस्था चोख असतानाही रात्रीच्या अंधारात चोरट्यांकडून चंदनाचे भलेमोठे वृक्ष सहजरीत्या कापून लंपास केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सैन्यदलाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या कॅट््सच्या आवारात घूसखोरी करण्याचे धाडस चंदनचोरांकडून केले गेल्याने संताप व्यक्त होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाणारे सैन्याचे महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र गांधीनगर व जयभवानी रोड परिसरात आहे. चोरट्यांनी या केंद्रात जयभवानीरोड नाशिकरोड परिसरातून प्रवेश करत रेकार्ड अधिकारी मेसजवळील चंदनवृक्ष कापले. मुळापासून फांद्यापर्यंतचा सुमारे पाच हजार रुपये किमतीचा चंदनवृक्षाचा बुंधा चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी विष्णू सोलंकी (३६, रा. तोफखाना केंद्र) यांनी फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या घटनेत त्र्यंबक रस्त्यावरील ‘गुलमोहर’ या शासकीय निवासस्थानाच्या आवारात प्रवेश करून चोरट्यांनी दोन चंदनवृक्षांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी या घटनेत सुमारे दहा हजार रुपये किमतीचे चंदनवृक्षांचे दोन बुंधे मुळापासून कापून लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

Web Title:  Activists of Chandanchor's gang; Slaughter of three trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.