अजित पवारांना घेरावाच्या तयारीतील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:40+5:302021-07-02T04:11:40+5:30

नाशिक : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांना घेराव ...

Activists of Sambhaji Brigade preparing to besiege Ajit Pawar in police custody | अजित पवारांना घेरावाच्या तयारीतील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

अजित पवारांना घेरावाच्या तयारीतील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

नाशिक : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांना घेराव घालून आपल्या मागण्यांचे निवेदन देण्याच्या तयारीत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी (दि.१) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार व पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत कारवाईचा निषेध केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्यासह अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांना घेराव घालून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे तयारी करण्यात आली होती. त्यासाठी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते अशोक स्तंभ येथे जमलेले असताना ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेराव घालणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने संभाव्य आंदोलस्थळी घटनेपूर्वीच दाखल होत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून निदर्शने करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी कारवई केली. मात्र, अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा मार्ग बदलून थेट पुढील कार्यक्रमासाठी गेल्यामुळे संभाव्य आंदोलनाचा पेच टळला.

010721\01nsk_27_01072021_13.jpg~010721\01nsk_28_01072021_13.jpg

अजित पवार यांंना  घेराव घालण्याच्या तयारीत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलीस~अजित पवार यांंना  घेराव घालण्याच्या तयारीत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलीस

Web Title: Activists of Sambhaji Brigade preparing to besiege Ajit Pawar in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.