धर्मवीर बलिदान मासनिमित्ताने कार्यकर्त्यांनी केले मुंडण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 01:01 AM2021-03-15T01:01:46+5:302021-03-15T01:02:04+5:30

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागातील असंख्य धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासनिमित्त नाशिक शहरातील विविध भागांत धर्मवीर बलिदान मास म्हणून रविवारी सामूहिक मुंडन करून घेतले.

Activists shave their heads on the occasion of Dharmaveer Sacrifice Mass! | धर्मवीर बलिदान मासनिमित्ताने कार्यकर्त्यांनी केले मुंडण !

धर्मवीर बलिदान मासनिमित्ताने कार्यकर्त्यांनी केले मुंडण !

googlenewsNext

नाशिक : श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागातील असंख्य धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासनिमित्त नाशिक शहरातील विविध भागांत धर्मवीर बलिदान मास म्हणून रविवारी सामूहिक मुंडन करून घेतले. ‘वर्ष तीन सौ बित गए। शंभु के 
बलिदान को. . .कौन जीता, कौन हारा पूछ लो संसार को’ या गीताचे सामूहिक पठन यावेळी करण्यात आले. 
धर्मवीर संभाजी महाराजांना पकडले गेल्या क्षणापासून सतत तीस दिवस यातना देऊन फाल्गुन अमावस्येला मारले गेले. ते तीस दिवस श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळतात. धर्मवीर संभाजी महाराजांना पकडले गेल्या क्षणापासून सतत तीस दिवस यातना देऊन फाल्गुन अमावस्येला मारले गेले. ते तीस दिवस श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळतात. हा मास अनेक वर्षांपासून पाळण्यात येत आहे. त्याची सुरुवात धारकऱ्यांनी सकाळी रामकुंडावर एकत्र येऊन सामूहिक मुंडन करून केली. 
धारकरी असा 
पाळणार मास 
या धर्मवीर बलिदान मास प्रारंभ रामकुंडावर सामूहिक मुंडन करून करण्यात आला. त्यात सहभागी झालेला प्रत्येक धारकरी हा त्यातील प्रत्येक जण केवळ एक वेळेचे अन्नग्रहण करून, पायात पादत्राणे न घालता, कोणत्याही आनंदोत्सवात सामील न होता आपल्या छत्रपती राजाला मानवंदना देऊन कठोरपणे हे व्रत संपूर्ण ३० दिवस पाळणार आहे.

Web Title: Activists shave their heads on the occasion of Dharmaveer Sacrifice Mass!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.