मतदान प्रक्रियेपर्यंत कार्यकर्त्यांनी जागरूक राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:46+5:302020-12-26T04:12:46+5:30
नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीत ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणूक आढावा बैठक शुक्रवारी पक्ष निरीक्षक योगेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ...
नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीत ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणूक आढावा बैठक शुक्रवारी पक्ष निरीक्षक योगेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी तालुकाध्यक्षांनी आपापल्या तालुक्यातील आढावा सादर करून राजकीय परिस्थिती मांडली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कायद्यांविरोधात जनमत असून, अशा वातावरणाचा पक्षाने लाभ उठवावा, असा सूर सर्वांनी लावला. जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी प्रास्ताविक करताना, निवडणुकीत महाआघाडी करताना विश्वासात घेऊनच निर्णय होत असेल तर ठीक, अन्यथा काँग्रेस पक्ष स्वबळावर ग्रामपंचायत आणि नगरपंचायत लढण्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी काँग्रेसचे दिवंगत नेते व शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या कल्याणासाठी सोनिया गांधी यांनी राज्य सरकारला पत्र दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. व्यासपीठावर माजी मंत्री शोभा बच्छाव, शरद आहेर, रमेश कहांडोळ, दिगंबर गिते, ज्ञानेश्वर काळे, संपत वक्ते, दिनेश चौथवे, अलमेश शेख, रौफ कोकणी, वामन खोसकर, गोपाळ लहांमगे, जनार्दन माळी, बाळासाहेब कुक्कड आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.