शैक्षणिक कर्ज योजनेचा उपक्रम चांगला : भोस

By admin | Published: September 7, 2015 10:40 PM2015-09-07T22:40:06+5:302015-09-07T22:41:07+5:30

वार्षिक सभा : न्यायालयीन कर्मचारी पतसंस्था

The activities of educational loan scheme are good: Bhos | शैक्षणिक कर्ज योजनेचा उपक्रम चांगला : भोस

शैक्षणिक कर्ज योजनेचा उपक्रम चांगला : भोस

Next

नाशिक : न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकांनी सभासदांच्या पाल्यांसाठी सुरू केलेली शैक्षणिक कर्ज योजना हा चांगला उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांनी केले़ जिल्हा न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते़ पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला़
भोस पुढे म्हणाले की, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून, त्यामध्ये पाल्यांना टिकायचे असेल तर शिक्षण गरजेचे आहे़ या शिक्षणासाठी सभासदांना जर कर्ज उपलब्ध झाले तर त्यांच्या पाल्यांना चांगले शिक्षण घेण्यास चांगली मदत होईल़ पतसंस्थेचे अध्यक्ष अयुबखान अब्दुलखान पठाण यांनी शैक्षणिक कर्ज योजनेचे व्याप्ती समजावून सांगत देशांतर्गत शिक्षणासाठी एक लाख, तर परदेशी शिक्षणासाठी दोन लाख रुपये कर्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम, व्ही़ ए़ दौलताबादकर, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे, अ‍ॅड़ जयंत जायभावे, अ‍ॅड़ नितीन ठाकरे, एस़ डब्ल्यू. महाजन, आऱ एस़ बाग, स्वीय सहायक व्ही़ एम़ अहेर यांच्यासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, पतसंस्थेचे संचालक व सभासद उपस्थित होते़ प्रास्ताविक जगदीश देवरे यांनी केले़ दिगंबर निकम यांनी आभार मानले़

Web Title: The activities of educational loan scheme are good: Bhos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.