आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आनंदी सहवास संस्थेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:04 AM2017-07-31T01:04:09+5:302017-07-31T01:04:15+5:30
सामाजिक बांधिलकीतून आनंदी सहवास या संस्थेच्या वतीने आदिवासी दुर्गम पाड्यांवरील गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मदतीचा उपक्रम राबवित त्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे. आनंदी सहवास संस्थेच्या वतीने दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावरील सुमारे २०० मुलांना दत्तक योजनेत वह्या, पुस्तके व शालेय बॅग यांचे वाटप करण्यात आले.
नाशिक : सामाजिक बांधिलकीतून आनंदी सहवास या संस्थेच्या वतीने आदिवासी दुर्गम पाड्यांवरील गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मदतीचा उपक्रम राबवित त्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे.
आनंदी सहवास संस्थेच्या वतीने दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावरील सुमारे २०० मुलांना दत्तक योजनेत वह्या, पुस्तके व शालेय बॅग यांचे वाटप करण्यात आले. आनंदी सहवास संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमात यंदा आदिवासी भागातील १६१ आणि नाशिक शहरातील ४० मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च करण्यात येत आहे. या संस्थेच्या वतीने नवीन शैक्षणिक साहित्य खरेदीबरोबरच जी मुले वरच्या वर्गात गेल्यावर आपली चांगल्या स्थितीतील पुस्तके व शालेय बॅग (दप्तर) वापरत नाहीत, अशा इंग्रजी शाळेतील मुलांकडून सदर बॅग्ज संकलित करून त्या आदिवासी भागातील गरजू मुलांना देण्यात आल्या. यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी देवसाने, शिंदेपाडा, मोरवाणपाडा, चरणपाडा, उपळीपाडा या आदिवासी भागात जाऊन शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला. त्याचप्रमाणे मेरी येथील जोशी आठवले या शाळेतील ४० मुलांना दत्तक घेऊन विविध शैक्षणिक साहित्याची मदत केली. या उपक्रमात आनंद सहवास संस्थेचे मंजूषा सोनार, मयूर मराठे, प्रतिभा सोनार, हेमंत पवार, रोहन विसपुते, सागर सावरगावकर, हेमंत राजगुरु, शीतल परब, मुकेश चव्हाण, मुक्तार कुरेशी, अजित थोरात, किशोर सोनार आदि सहभागी झाले होते.
मुलांचे चेहरे आनंदाने फुलले
आदिवासी भागातील मुले पाड्यावरून लांब अंतरावर पायपीट करीत शाळेत जातात. त्यांच्याकडे वह्या पुस्तके ठेवल्यासाठी कापडी पिशवी असते. काही विद्यार्थ्यांकडे मात्र कापडी पिशवीदेखील नसल्याने वह्या पुस्तके पावसात भिजतात. हातातून पाण्यात किंवा चिखलात पडतात. मात्र या मुलांना स्कूल बॅग्ज (दप्तर) दिल्याने त्यांच्या चेहºयावर आनंद दिसून आला, असे संस्थेचे प्रमुख किरण सोनार यांनी सांगितले.