'निर्भया'ला आदर्श सामाजिक संस्था सेवारत्न पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:14 AM2021-04-27T04:14:58+5:302021-04-27T04:14:58+5:30
चास येथील रहिवासी व दातली येथील शिक्षक एकनाथ भाबड यांची कन्या सृष्टी हिने निर्भया ग्रुप स्थापन केलेला असून, ‘तिच्या ...
चास येथील रहिवासी व दातली येथील शिक्षक एकनाथ भाबड यांची कन्या सृष्टी हिने निर्भया ग्रुप स्थापन केलेला असून, ‘तिच्या अस्तित्वासाठी' हे ब्रीदवाक्य मनात रुजवून टीम निर्भयामधला प्रत्येकजण आठ वर्षांपासून कार्यरत आहे. खेड्यापाड्यात जाऊन प्रत्येक महिला, मुलीला मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या शरीरातील हालचाली, स्वच्छता इतकेच नव्हे तर सॅनिटरी पॅड्स कसे वापरावेत, याबाबत टीम निर्भया मोफत सेमिनार व प्रशिक्षण देण्याचे काम करते. दुर्गम भागातील शाळा, आश्रमशाळांत जाऊन तेथील महिलांना व मुलींना मोफत सॅनिटरी पॅड्सचे वाटप केले जाते. कराटे, तायक्वांदो, महिलांनी व मुलींनी स्वसंरक्षणासाठी करावयाच्या गोष्टी यासाठी मोफत प्रशिक्षणही दिले जाते.
इन्फो...
पथनाट्य उपक्रमांतही अग्रभागी
पथनाट्याचे उपक्रमही प्रतिभा पाटील, सृष्टी भाबड, मयुरी वनवे, मृणाल कुऱ्हेकर, प्रीती आव्हाड, हर्षदा वीर, संजना अलमेडा, मानसी कानडे, मयुरी काळे, भावेश जिवरख, धनंजय बेंद्रे, विकास घोडेराव, आकाश गोरे, शिवराज जाधव, आशुतोष कव्हाने, किशोर साखरे, रविराज हांडे या सर्व सदस्यांच्या टीममार्फत राबवले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या राज्यस्तरीय ‘गुणिजन गौरव महासंमेलनात निर्भया’ ग्रुपचा गौरव करण्यात आला.