महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवित दाखविली ‘आदिशक्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 08:46 PM2017-09-16T20:46:18+5:302017-09-16T20:46:24+5:30

स्वसंरक्षणासाठी केवळ शस्त्रास्त्र अथवा ज्युडो, कराटे व मार्शल आर्टसारख्या कौशल्यावर अवलंबून न राहता आत्मविश्वास व दक्षता या गुणांसह संकटसमयी स्वत:चे संरक्षण स्वत:च करता येणे शक्य असल्याचा विश्वास

'Adashakti' shows women self-defense lessons | महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवित दाखविली ‘आदिशक्ती’

महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवित दाखविली ‘आदिशक्ती’

Next
ठळक मुद्देजल्लोष आदिशक्तीचा जागर स्वरक्षणाचा’ उपक्रमांतर्गत ’मीच माझी रक्षक’ या विषयांवर चौघुले यांनी विविध प्रात्यक्षिके

नाशिक : स्वसंरक्षणासाठी केवळ शस्त्रास्त्र अथवा ज्युडो, कराटे व मार्शल आर्टसारख्या कौशल्यावर अवलंबून न राहता आत्मविश्वास व दक्षता या गुणांसह संकटसमयी स्वत:चे संरक्षण स्वत:च करता येणे शक्य असल्याचा विश्वास स्वसंरक्षण प्रशिक्षक अंजुषा चौघुले यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागवला.
मुंबई नाका पोलीस ठाणे व आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जलसा लॉन्स येथे आयोजित ‘जल्लोष आदिशक्तीचा जागर स्वरक्षणाचा’ उपक्रमांतर्गत ’मीच माझी रक्षक’ या विषयांवर चौघुले यांनी विविध प्रात्यक्षिके करून दाखवत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अभिनेत्री रुची कदमसह भाजपा महिला आघाडी प्रमुख पुष्पा शर्मा, शहराध्यक्ष रोहिणी नायडू, भारती बागुल, नगरसेवक शाहिन मिर्झा, रूपाली निकुळे आदि उपस्थित होत्या. यावेळी महिला व मुलींसह शालेय विद्यार्थिनींनीही सहभाग घेऊन स्वसंरक्षणाचे धडे गिरवले. दरम्यान, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी पालकांनी आपल्या पाल्यांच्या सोशल मीडियावरील वर्तणुकीवर लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच योग्य वयात आवश्यक त्या योग्य गोष्टींचे ज्ञान पालकांनीच मुलांना देणे गरजेचे असल्याचे सांगितले. आदिशक्ती प्रतिष्ठानचे संस्थापक तथा आरोग्य समिती सभापती सतीश कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले, तर आदिशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष संध्या कुलकर्णी यांनी आभार मानले.

Web Title: 'Adashakti' shows women self-defense lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.