अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 09:51 PM2020-10-08T21:51:54+5:302020-10-09T01:23:27+5:30
नाशिक : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका वाहिनीवर बोलताना खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधाना संदर्भात नाशकातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी ( दि.८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी राजे यांच्या संदर्भातअॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या अवमानकारक विधानानंतर नाशिक मध्ये मराठा समाज तीव्र प्रतिक्रिया उमटली. मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक तथा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यासमोर एकत्र येत अॅड. गुणवंत सदावर्ते यांच्यावर समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्या च्या मागणीसाठी निदर्शने केली. त्याचप्रमाणे आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांना निवेदन देत सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, क्रांती मोर्चाचे करण गायकर, तुषार गवळी, चेतन शेलार, निलेश शेलार, तुषार जगताप, गणेश कदम, अस्मिता देशमाने, माधुरी पाटील यांसह विविध कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.