व्यसनाधीनता देशासमोर मोठे आव्हान
By admin | Published: August 28, 2016 10:46 PM2016-08-28T22:46:29+5:302016-08-28T22:58:33+5:30
विवेक घळसासी : वसंत गौरव पुरस्काराचे सटाण्यात वितरण
व्यसनाधीनता देशासमोर मोठे आव्हानसटाणा : जगात एकूण तरु णांपैकी सर्वाधिक लोकसंख्या भारतीय
तरूणांची आहे. हीच बाब हेरून शेजारील भारतविरोधी राष्ट्रांकडून भारतीय तरूणांना व्यसनाधीन बनविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. भारतीय तरूणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता हे आपल्या देशासमोर मोठे आव्हान असून, देशातील तरूणांनी देशसेवा, समाजसेवा आणि नवनिर्मितीची नशा करावी.
जीवनज्योत ट्रस्टकडून गेल्या तीस वर्षांपासून कर्करोगग्रस्त रुग्णांची सेवा केली जात आहे. त्यांचे हे कार्य बघून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सावला आणि त्यांच्या सहकारी डॉ. ईलाबेन यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.
ट्रस्टचे संस्थापक सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील, डॉ. प्रशांत पाटील,
डॉ. कल्याणराव भोसले, जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, प्रा.
अनिल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, पांडुरंग सोनवणे, विजय वाघ, श्यामकांत मराठे, समीर पाटील, डॉ. विजया पाटील, मनीषा पाटील, अरविंद सोनवणे, रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, डॉ. व्ही. डी. पाटील, प्रा. शं. क. कापडणीस, प्रा. बी. डी. बोरसे आदिंसह साहित्यरसिक आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र मेतकर यांनी केले. (वार्ताहर)