अपर महासंचालकांनी घेतली पोलिसांची ‘शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:10+5:302021-07-30T04:15:10+5:30
गुरुवारी सकाळी अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग पोलीस ठाण्यात दखल झाल्यानंतर त्यांनी नगदी कारकून, गुन्हे कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष, ...
गुरुवारी सकाळी अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग पोलीस ठाण्यात दखल झाल्यानंतर त्यांनी नगदी कारकून, गुन्हे कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष, गोपनीय विभाग, मुद्देमाल विभागात जाऊन काम करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना दैनंदिन चालणाऱ्या कामाची माहिती घेतली. किती गुन्हे प्रलंबित आहे, कोणत्या नोंदवहीत काय माहिती आहे, तुम्ही काय काय काम करतात, काम करताना काय अडचणी निर्माण होतात, गुन्हे शोध पथक, ऑनलाइन पासपोर्ट, वर्तन चरित्र पडताळणी याची माहिती जाणून घेत कर्मचाऱ्यांना काही अडचणी आहेत का, याची माहिती घेत प्रत्येक विभागात जाऊन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधला.
राजेंद्र सिंग हे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी परिमंडळ एक मधील विभाग दोन तसेच पंचवटी पोलीस ठाणे येथे भेट देत वार्षिक दप्तर तपासणी केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. राजेंद्र सिंग यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था विभाग असल्याने त्यांनी कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. दुपारी पंचवटी पोलीस ठाण्यात कवायत सराव घेतला. यावेळी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, पोलीस निरीक्षक अशोक साखरे, सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार शेखर फरताळे, बाळासाहेब मुर्तडक, अंकुश सोंजे, राजेश सोळशे आदींसह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
इन्फो बॉक्स==
कर्मचाऱ्यांची घेतली शाळा
वार्षिक दप्तर तपासणी कामानिमित्त आलेल्या राज्याच्या पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग ४ तास पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. सिंग यांनी दुपारी पोलीस कवायत सराव, ड्रिल घेत कर्मचाऱ्यांना सूचना देत पोलीस ठाणे अंमलदार कक्षात गेल्यावर रोज किती तक्रार येतात, अदखलपात्र तक्रारी किती येतात, पोलीस ठाणे हद्दीत संमिश्र वस्ती आहे का, याची माहिती जाणून घेत पोलीस कर्मचाऱ्यांची राज्याच्या अपर पोलीस महासंचालकांनी शाळा घेतल्याचे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले.