सिव्हीलच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सकपदी डॉ. श्रीनिवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:37 PM2020-10-03T22:37:56+5:302020-10-04T01:08:49+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त शल्य चिकीत्सकपदी डॉ. प्रसाद श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकीत्सक वर्गातील ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्याअंतर्गत डॉ. श्रीनिवास हे नाशिकला रुजू होणार आहेत.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक हे पद रिक्त होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर सिव्हीलच्या त्या पदावर डॉ. निखील सैंदाणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. सैंदाणे हे मालेगावलादेखील काही काळ नोडल आॅफीसर म्हणून कार्यरत होते. मात्र, तिथून नाशिकला परतल्यावर त्यांना पुन्हा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक या पदावर नियुक्त करण्यात आले होते. मात्र, शासनाने नव्याने काढलेल्या या बदली आदेशामुळे डॉ. श्रीनिवास हे नाशिकला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून कामकाज पाहणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकीत्सक पदावर कार्यरत असलेले डॉ. श्रीनिवास नवीन आठवड्यात नाशिकला रुज होण्याची शक्यता आहे.
डॉ. रावखंडे यांना अधिकृत नियुक्ती
जिल्हा रुग्णालयाचे माजी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना साताºयात वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर प्रारंभी तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ. रत्ना रावखंडे यांची शासनाकडून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.