अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ होले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 06:47 PM2018-09-01T18:47:38+5:302018-09-01T18:54:02+5:30

नाशिक : जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ गजानन एम़ होले (५७) यांचे शनिवारी (दि़१) सकाळी निधन झाले़ कर्करोगाने ग्रस्त असलेल्या होले यांच्यावर गत काही महिन्यांपासून उपचार सुरू होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे़

Additional District Surgeon Dr. Holle passes away | अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ होले यांचे निधन

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ होले यांचे निधन

Next
ठळक मुद्दे जिल्हा रुग्णालय : प्रख्यात सर्जन : ३० वर्षे आरोग्य सेवा

नाशिक : जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ गजानन एम़ होले (५७) यांचे शनिवारी (दि़१) सकाळी निधन झाले़ कर्करोगाने ग्रस्त असलेल्या होले यांच्यावर गत काही महिन्यांपासून उपचार सुरू होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे़

नागपूरमधून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर १९८६ साली ते आरोग्यसेवेत दाखल झाले होते़ १९९७ पर्यंत वर्धा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, यानंतर मुंबई, दिंडोरी ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, मनमाड उपजिल्हा रुग्णालयात सेवा केली़ २०१३ पासून ते जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदावर कार्यरत होते़ कर्करोगाने ग्रस्त असलेल्या होले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते़ शनिवारी त्यांचा मृत्यू झाला़

डॉ़ होले यांचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते़ यानंतर अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ डॉ. होले यांच्या निधनाने जिल्हा रुग्णालयात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक तथा आरोग्य उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे यांनी व्यक्त केले.

Web Title: Additional District Surgeon Dr. Holle passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.